रशियाचा युक्रेनवर 550 क्षेपणास्त्रs-ड्रोन्सद्वारे हल्ला
270 क्षेपणास्त्र नष्ट, 200 हून अधिक ड्रोन्स जाम केल्याचा अध्यक्ष झेलेंस्कांचा दावा : रशियाकडून कीव्ह शहर ठरले लक्ष्य
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाने युक्रेनवर शुक्रवारी 500 क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सद्वारे हल्ला केला आहे. यातील 270 क्षेपणास्त्रs आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केला आहे. याचबरोबर 330 शाहेद ड्रोन्सपैकी 208 ड्रोन्सना इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे जाम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे ड्रोन्स इराणमध्ये निर्माण करण्यात आले होते.
रशियाने या हल्ल्याद्वारे युक्रेनची राजधानी कीव्हला लक्ष्य केले आहे. कीव्हसोबत दिप्रो, सुमी, खारकीव्ह, चेर्निहिव आणि आसपासच्या भागांनाही या हल्ल्यांमुळे नुकसान पोहोचले आहे. या हल्ल्यात कमीतकमी 23 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात कीव्हमधील इमारती, दुकाने, एक शाळा, रुग्णालय, रेल्वेमार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले.
ट्रम्प-पुतीन यांच्यात चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेन, इराण आणि अमेरिका-रशिया संबंधांसमवेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यादरम्यान पुतीन यांनी युक्रेन युद्धामागील कारणच संपुष्टात आणणर असल्याचे स्पष्ट पेले. युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार आहे, परंतु युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्याचा हट्ट सोडावा लागेल. तसेच 2022 नंतर रशियाने ज्या भागांवर कब्जा केला आहे, त्याला मान्यता द्यावी लागेल, असे पुतीन यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध लवकर संपुष्टात आणण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला.