For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाचा युक्रेनवर हल्ला, भारतीय ठार

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियाचा युक्रेनवर हल्ला  भारतीय ठार
Advertisement

एकूण 12 जणांचा मृत्यू : मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद नाही

Advertisement

कीव्ह : रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्ह समवेत अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 12 जण मृत्युमुखी पडले असून ज्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी ही माहिती दिली आहे.रशियाच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारीच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान अंतहीन युद्धातून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनमध्ये पेलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आयोजित एससीओच्या शिखर परिषदेच्या दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर स्थितीला सामोरे जाण्याचे काम सुरु आहे. रशियाने हल्ल्याकरता मोठ्या संख्येत जेट-पॉवर्ड ड्रोन्स आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.