कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव कंटेनर उलटला; तासभर वाहतूक ठप्प

05:05 PM Dec 07, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                  सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर कंटेनर उलटला, प्रवाशांमध्ये तणाव

Advertisement

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडून सोलापूरकडे येणारा भरधाव कंटेनर बोरामणी गावाजवळ शनिवारी उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. भरधाव कंटेनर (एमएच ४६ सीयू ४४७६) अचानक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन उलटला. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि तब्बल तासभर संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.

Advertisement

कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट दुभाजकावर आदळून कंटेनर उलटला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कंटेनर महामार्गाच्या मधोमध अडकल्याने सोलापूर ते हैदराबाद दोन्ही दिशेने वाहनांची प्रचंड गर्दी झाली.बस, ट्रक, खासगी वाहने, रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वार तासन्तास रस्त्यावर अडकून पडले होते.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रैफिक जाममुळे प्रवाशांना मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले.

माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. कंटेनर हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कंटेनर रात्री उशिरा हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. या मार्गावर वारंवार होणारे अपघात आणि दुभाजकावरील असुरक्षित स्थिती याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. "जोपर्यंत प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत असे अपघात सुरूच राहणार," अशी प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहे. अपघाताची अधिकृत नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Next Article