महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदीसाठी गर्दी

10:27 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवार दि. 31 पासून प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्य खरेदीला वेग आला आहे. शहरातील दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी यावर्षी नाविन्यपूर्ण व आकर्षक डिझाईनमधील बॅग तसेच इतर साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने विद्यार्थ्यांची तयारी सुरू झाली आहे. बऱ्याच शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात असले तरी उर्वरित शाळांमधील विद्यार्थी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. वही, कंपास पेटी, बॅग, पुस्तके, वॉटर बॅग, पेन, पेन्सिल, दप्तर, पावसाळी रेनकोट, छत्री, यासह इतर साहित्य विक्रीसाठी दुकानामध्ये दाखल झाले आहे. आपल्या आवडीप्रमाणे साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी होत आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश दिला जातो. परंतु खासगी व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष खरेदी करावा लागतो. शाळांनी निवडक दुकानांची यादी तयार केली असून त्यामध्ये साईझनुसार गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे दुकानांमध्ये गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article