For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्षाविहारासाठी पर्यटकांची झुंबड

05:57 PM Jul 28, 2025 IST | Radhika Patil
वर्षाविहारासाठी पर्यटकांची झुंबड
Advertisement

लोणावळा :

Advertisement

पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. लोणावळा शहरामधील भुशी धरण व लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची सर्वाधिक झुंबड उडत असून, शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

घाट माथ्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. डोंगर भागामधून धबधबे प्रवाहित होऊन वाहू लागले आहेत. या धबधब्यांच्या खाली उभे राहून भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटक घेत आहेत. भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, खंडाळा राजमाची पॉईंट, ड्युक्स नोज, सनसेट पॉईंट, तुंगार्ली धरण यासह ग्रामीण भागामधील भाजे धबधबा, पवनानगरचा परिसर, कार्ला लेणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झाली.

Advertisement

पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी व या पाण्यामध्ये बसून वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून पर्यटक लोणावळा शहरांमध्ये येत असतात. मुख्य म्हणजे वाहतूक कोंडीची तमा न बाळगता पर्यटक लोणावळ्याला पसंती देतात. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे या सर्व परिसरातील अर्थकारणालादेखील मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांपासून अगदी पर्यटनस्थळ परिसरामध्ये चहा, भजी वडापाव विक्री करणाऱ्या विक्रेत्यांपासून सर्वांना यामधून रोजगार उपलब्ध होत आहे.

Advertisement
Tags :

.