कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक

03:06 PM Feb 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दहिवडी : 

Advertisement

राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माण, खटाव तालुक्यांसह जिह्यावर शोककळा पसरली. बोराटवाडी (ता. माण) येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भगवानराव गोरे यांना राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

Advertisement

भगवानराव गोरे यांच्यावर गेल्या चार महिन्यांपासून पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भवानराव गोरे 1990 ते 95 बोराटवाडीचे सरपंच होते. 2020 पासून त्यांनी येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमनपद भूषविले. सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक आणि माण तालुका संघटनेचे ते अध्यक्ष होते. समता शिक्षण मंडळातही ते संचालक पदावर कार्यरत होते.

भगवानराव गोरे यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार सचिन पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, राम सातपुते, हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, एसपी समीर शेख, सोलापूरचे जिल्हाधिकारी, सीईओ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रांत उज्ज्वला गाडेकर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, विक्रम पावसकर, पंढरपूरचे पोलीस निरिक्षक विश्वजित घोडके, सर्व राजकीय पक्षांचे आजी, माजी पदाधिकारी यांनी श्रध्दांजली अर्पण गेली. मंत्री जयकुमार गोरे, उद्योजक अंकुश गोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे, नगरसेविका सुरेखा पखाले यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रधान सचिव एकनाथ डवले, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आमदार मनोज घोरपडे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार हेमंत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार चित्राताई वाघ, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार अमोल महाडिक, आमदार सुरेश धस, आमदार गिरीश चौधरी, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, जीवन गलांडे, मनोहर गव्हाड, रुपालीताई चाकणकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, मकरंद देशपांडे, चेतनसिंह केदारी, आप्पासाहेब देशमुख, प्रभाकर देशमुख, सुंदरगिरी महाराज, मुकुंद आफळे, सागर महाराज बोराटे, खटाव, माण तहसिलदारांसह सांगली, सातारा, सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडे असा मोठा पा†रवार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंदेश पाठवून मंत्री जयकुमार गोरे आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. या दु:खातून सावरण्याची शक्ती गोरे कुटुंबियांना मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article