आ . दीपक केसरकर नेहमीप्रमाणे मतदारसंघातून गायब झालेत
ठाकरे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांची टीका
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर नेहमीप्रमाणे मतदारसंघातून कुठेतरी गायब झाले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते नाराज होऊन दिल्ली की मुंबई मध्ये आहेत हे शोधावे लागेल. सध्या सावंतवाडी शहर व ग्रामीण भागात मळगाव घाटात रस्त्याची कामे सुरू असून ती निकृष्ट दर्जाची आहेत. सध्या प्रशासनावर कोणाचा अंकुश नसल्याची स्थिती आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बाळू माळकर ,निशांत तोरस्कर, विनोद ठाकूर उपस्थित होते. श्री राऊळ पुढे म्हणाले मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाले ही चांगली बाब आहे . परंतु मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने जिल्ह्यात येताना त्यांचे जल्लोषी स्वागत झाले आणि गवगवा करण्यात आला हेच जर येथील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काहीतरी केले असते तर ते आनंदाचे झाले असते. असे ते म्हणाले. जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका असो त्या निवडणुकीत कुठल्याही दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्ता घ्यायचा असेल तर त्याला सहा महिन्यापूर्वी प्रवेश देणे हिताचे ठरेल . विधानसभा निवडणुकीत आम्हाला शिवसेनेची चाळीसही मते मिळाली परंतु अन्य मते का मिळाली नाहीत याचे चिंतन झाले आहे. मात्र कुणीही नाराज नाही असेही ते म्हणाले.