महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रुपेश पावसकरांनी दिला उबाठा ओबीसी सेल जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

05:22 PM Nov 12, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अन्यायाला व अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलो ; पावसकर

Advertisement

कुडाळ -

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबीसी सेलच्या सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख रुपेश अशोक पावसकर यानी आपल्या या पदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान,सध्या आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला व अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलो आहे.तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही.या कारणामुळेच आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर याना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. श्री पावसकर यानी उबाठा ओबीसी सेल जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा श्री दुधवडकर याना पाठविला आहे.यात त्यांनी म्हटले आहे की, या पदावर काम करीत आहे. माझी नियुक्ती झाल्यापासून ते आजपर्यंत मी माझ्या पक्षाला उभारी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ओबीसी सेलचा जिल्हाप्रमुख म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र फिरून संघटना वाढविली. परंतू, पक्षात सध्या माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला तसेच अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला आता मी कंटाळलो आहे. या अशा अंतर्गत राजकारणामुळे काम करण्याचा उत्साह राहत नाही.

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मी अत्यंत प्रामाणिक आणि हिरीरीने काम करीत आहे. मतदारसंघातील संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी अगदी पदरमोड करून काम करीत आहे, असे असताना मतदारसंघातील काही महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठ नेत्यांनी मला तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. परंतू, तसे होताना दिसून येत नाही. असे प्रकार नेहमीच होत असल्याने मनाला अतीव वेदना होतात. त्यामुळे आज मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे. आपण तो स्विकारावा, असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :
# TARUN BHARAT NEWS# RUPESH PAWASKAR # TARUN BHARAT SINDHUDURG#
Next Article