महिन्याला 50 किमी पळा, पूर्ण बोनस मिळवा
कंपनीची अनोखी ऑफर
सर्वसाधारणपणे कुठलीही कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना कामाच्या आधारावर बोनस देत असते. अनेकदा कंपन्यांमध्ये टार्गेट पूर्ण करण्यावरूनही बोनस देण्याचे नियम असतात. परंतु चीनच्या ग्वानडोंग प्रांतातील एका पेपर कंपनी डोंगपोने स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी अजब नियम केला आहे. हा नियम अॅथलेटिक हालचालींवर आधारि अताहे.
स्वत:च्या 100 कर्मचाऱ्यांदरम्यान एका आरोग्यदायी जीवनमानाला चालना देण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांच्याकडून करण्यात आलेल्या एक्सरसाइजच्या आधारावर बोनस देण्याचा निर्णय घेतल आहे. जर एखादा कर्मचारी दर महिन्याला 50 किलोमीटर धावत असेल तर तो पूर्ण मासिक बोनससाठी पात्र असणार आहे. तर 40 किलोमीटर धावल्यास 60 टक्के आणि 30 किलोमीटर धावल्यास 30 टक्के बोनस मिळणार आहे. तर एक महिन्यात 100 किमीपेक्षा अधिक धावणाऱ्या कर्मचाऱ्याला 130 टक्के बोनस दिला जाणार आहे.
फोनवर टॅक होते अॅक्टिव्हिटी
माझे कर्मचारी तंदुरुस्त असतील तरच माझा बिझनेस टिकू शवपे. मागील तीन वर्षे स्वत:च्या कर्मचाऱ्यांना खेळ आणि फिटनेसचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून धावून कापण्यात आलेले अंतर त्यांच्या फोनवरील एका अॅपद्वारे ट्रॅक केले जाते. हा अॅप माउंनटेन हायकिंग आणि जलद चालण्यासारख्या हालचालींना देखील नोंदविते असे डोंगपो पेपरचे बॉस लिन झियोंग यांनी सांगितले आहे.
डोंगपो पेपरचे कर्मचारी नव्या बोनस रचनेबाबत अत्यंत आनंदी आहेत. कंपनी आता एका दगडातून दोन पक्षी मारण्यास आम्हाला मदत करत आहे. आता आम्ही तंदुरुस्तदेखील राहू आणि याकरता आम्हाला पैसेही मिळतील असे कर्मचाऱ्यांचे सांगणे आहे. कंपनीच्या या नव्या धोरणाला सर्वसाधारणपणे सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे, तर काही जणांचे यामुळे भेदभाव होऊ शकतो असे मानणे आहे. कंपनीचे धोरण चांगले आहे, परंतु यामुळे कर्मचाऱ्यांदरम्यान कुठलीही वर्तमान स्थिती किंवा आरोग्यसंबंधी मुद्द्यामुळे भेदभाव होऊ शकतो असे एका इसमाने म्हटले आहे.