For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अराघची यांच्या मॉस्को दौऱ्यावरून ट्रम्प संतापले

06:15 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अराघची यांच्या मॉस्को दौऱ्यावरून ट्रम्प संतापले
Advertisement

 विध्वंसाचा इशारा : रशियाचेही रोखठोक प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तणाव वाढतच आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची रशियाच्या दौऱ्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल होताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हा दौरा उधळून लावण्याची धमकी दिली आहे. याचदरम्यान, रशियानेही अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून एक मोठे निवेदन आले आहे. लष्करी शक्तीच्या धमकीने इराणला घाबरवता येणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. रशिया दौऱ्यापूर्वी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तान आणि ओमानला भेट दिली होती.

Advertisement

व्हिएन्ना येथील एका आंतरराष्ट्रीय संघटनेतील रशियाचे प्रतिनिधी मिखाईल उल्यानोव्ह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लष्करी तैनातीची धमकी आणि निर्बंध अधिक कडक करणे हे ब्लॅकमेलिंग आहे. परंतु हे डावपेच इराणसमोर चालणार नाहीत. तडजोड करण्यासाठी अमेरिकेने आपली भूमिका नरम करावी,’ असे रशियन राजदूतांनी म्हटले आहे.

मी तेलवाहिन्या नष्ट करीन : डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. इराणने तीन दिवसांत करार केला नाही, तर त्यांच्या तेलवाहिन्यांमध्ये भीषण स्फोट घडवून आणले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराण जहाजांमार्फत तेल निर्यात करू शकत नाही आणि जर तेलवाहिन्या नष्ट झाल्या, तर त्यांची निर्यात पूर्णपणे थांबेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

रशिया दौरा समन्वयासाठी महत्त्वाचा : अब्बास अराघची

आपला रशिया दौरा युद्धोत्तर समन्वयासाठी एक महत्त्वाची संधी देतो. युद्धाशी संबंधित घडामोडी आणि सद्यस्थितीवर आमच्या रशियन मित्रांशी सल्लामसलत करण्याची ही आमच्यासाठी एक चांगली संधी आहे, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोमवारी सांगितले.

Advertisement
Tags :

.