For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : रत्नागिरीत गॅस तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल थेट गॅस एजन्सीवर

06:09 PM Mar 13, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri   रत्नागिरीत गॅस तुटवड्याच्या अफवेने गोंधळ  जिल्हाधिकारी मनुज जिंदल थेट गॅस एजन्सीवर
Advertisement

                         गॅससाठी रत्नागिरीत सलग सहाव्या दिवशी रांगा

Advertisement

रत्नागिरी - रत्नागिरी मध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक गॅस एजन्सी मध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत सलग सहाव्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी मधील शांतादुर्गा गॅस एजन्सी येथे आज शुक्रवारी भेट दिली व पाहणी केली.

यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शासन ग्राहकांना 25 दिवसातच एलपीजी सिलेंडर देण्याबाबत कटिबद्ध आहे. याबाबत वरिष्ठांशी देखील चर्चा केली गेली आहे, माहिती दिली गेली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधला आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन केले

Advertisement

Advertisement
Tags :

.