विमानांमध्ये बॉम्बच्या अफवांचे सत्र सुरूच
गेल्या तीन दिवसात 12 घटना उघड : अकासा-इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आणखी दोन इंडियन एअरलाईन्सच्या विमानांना बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या. इंडिगोच्या मुंबई-दिल्ली फ्लाइटला टेकऑफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तर अकासा एअरलाईन्सचे दिल्ली-बेंगळूर विमान अहमदाबादला वळवण्यात आले. तपासादरम्यान या विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. एकंदर गेल्या तीन दिवसात एकूण 12 विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत.
15 ऑक्टोबर रोजी 7 फ्लाईट्सवर बॉम्बच्या धमक्मया आल्या होत्या. त्यापूर्वी सोमवारी तीन विमानांमध्ये असेच प्रकार उघड झाले होते. दरम्यान, बॉम्बच्या ठेवल्यासंबंधीच्या धमक्यांचे सत्र वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी संबंधित अज्ञातांविरोधात गुन्हेही नोंद करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आता कडक कारवाई केले जाण्याचे संकेत मिळत असून अफवा पसरवणाऱ्यास किंवा धमकी देणाऱ्याला भविष्यात हवाई प्रवास करण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचे समजते. सततच्या धमक्मयांमुळे केंद्राने बुधवारी उ•ाणांवर एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. ते विमानात साध्या पेहरावातच तैनात असणार आहेत.