महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

06:07 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दाबोळी विमानतळावर सुरक्षेसाठी धावपळ

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

Advertisement

दिल्लीत एका हवाई प्रवाशाने विमानातच सोडून दिलेली आपली बॅग दाबोळी विमानतळावर घबराट निर्माण करणारी घटना ठरली. विमानात कुणी तरी बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली. दाबोळी विमानतळावर सुरक्षेसाठी धावपळ सुरू झाली अन् शेवटी त्या बॅगेत केवळ कपडे सापडले. या विमानात 171 प्रवासी होते.

दिल्लीहून एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास गोव्याच्या दिशेने उ•ाण केले होते. उ•ाणनंतर बऱ्याच वेळाने विमानातील कर्मचाऱ्याला एक अज्ञात बॅग आढळून आली. त्या बॅगेला कोणीच वाली नसल्याने त्या बॅगेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला नसावा ना असा संशय निर्माण झाल्याने विमानात घबराट पसरली. भीतीचा हा संदेश दाबोळी विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यामुळे या विमानतळावर सुरक्षेच्या खबरदारीसाठी एकच धावपळ उडाली. सदर विमान दाबोळीच्या हवाई कक्षेत पोहोचताच ते धावपट्टीवरील वर्दळीच्या ठिकाणी न उतरविता दूरवर उतरविण्यात आले. तेथे सर्व प्रवाशांना प्रथम सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले व ती बॅगही तपासण्यात आली. मात्र, त्या बॅगेत केवळ कपडे आढळून आले. त्यामुळे सर्वांना हायसे वाटले. याच विमानातून दिल्लीत उतरताना एका प्रवाशाने आपली बॅग समजून विमानातील एका कर्मचाऱ्याची बॅग नेली होती. त्यामुळे त्याची बॅग या विमानातच राहिली. त्यामुळेच सारा गोंधळ उडाला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article