For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसलेंना संजू परबांनी रोखले

02:07 PM Feb 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ऑनलाईन उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसलेंना संजू परबांनी रोखले
Advertisement

पालिकेची पहिलीच सभा ठरली वादळी ; सत्ताधारी - विरोधक आमनेसामने

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत- भोसले या ऑनलाइन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहिल्या. मात्र ,या मुद्द्यावरून विरोधी शिंदे शिवसेना पक्षाचे नगरसेवक संजू परब यांनी आक्षेप घेत नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांना ऑनलाईन उपस्थित राहण्यास देऊ नये असे स्पष्ट करत थेट विरोध केला. तात्काळ ऑनलाईन सिस्टीम बंद करा अशी सूचना केली. यावेळी भाजपचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी विरोधी पक्षाची सूचना मान्य करत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरंन्सिंग बंद करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नगरसेवक संजू परब यांनी स्पष्ट केले की, नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले रजेवर गेल्या आहेत असे असताना त्यांनी बैठकीला उपस्थित राहणे योग्य नाही आणि दोन दोन नगराध्यक्ष कशाला म्हणून आपण त्यांना रोखले असे स्पष्टीकरण दिले. सावंतवाडी शहरात 57 कोटी रुपये नळपाणी योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तेथे इंजिनिअर नाही. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही आपण केल्याचे श्री परब यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते बाबू कुडतरकर ,काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक देवेंद्र टेमकर आदींनी प्रश्न उत्तरात भाग घेतला . आजच्या बैठकीत आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, ॲड. सायली दुभाषी , ॲड .नीता सावंत कविटकर ,आनंद नेवगी आदींनी विविध विषयावर चर्चा केली. सावंतवाडी शहरात रस्ते खोदाई या प्रश्नावर ॲड.नीता सावंत -कविटकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.