For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट एसएमएससह फसवणूक रोखण्यासाठी नियम

07:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
बनावट एसएमएससह फसवणूक रोखण्यासाठी नियम
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आता बनावट एसएमएस आणि फिशिंग अशा बाबींवर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. ट्रायने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, व्यावसायिक संभाषणासाठी पाठवल्या जाणाऱ्या सर्व एसएमएस टेम्पलेटमध्ये असलेले ‘व्हेरिएबल घटक3’ प्री-टॅग करावे लागणार आहे. हा नियम विशेषत: नोंदणीकृत नसलेल्या लिंक्स आणि फसव्या कॉल बॅक नंबरना लक्ष्य करेल जे फसवणूक करणारे आपल्याला फसवण्यासाठी वापरतात. कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

ट्रायचा नवीन ‘प्री-टॅगिंग’ नियम

Advertisement

ट्रायचा हा नवीन नियम प्रामुख्याने एसएमएस टेम्पलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या डायनॅमिक कंटेंटशी संबंधित आहे. व्हेरिएबल घटक म्हणजे मेसेजचे ते भाग जे प्रत्येक रिसीव्हरसाठी बदलू शकतात. जसे की वेबसाइट किंवा अॅपची युआरएल (लिंक) अॅप्लिकेशन डाउनलोड लिंक, कॉल बॅकसाठी दिलेला फोन नंबर ऑफर रक्कम इ. नवीन नियमांनुसार, मेसेज पाठवणाऱ्या प्रिन्सिपल एंटिटी  म्हणजेच मेसेज पाठवणाऱ्या कंपनीला टेम्पलेट नोंदणी करताना व्हेरिएबल फील्डमध्ये काय समाविष्ट करायचे ते निर्दिष्ट करावे लागणार आहे.

60 दिवसांचा कालावधी

ट्रायने प्रवेश प्रदाते आणि प्रमुख संस्थांना त्यांच्या विद्यमान एसएमएस टेम्पलेट्समध्ये आवश्यक बदल करण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या कंपनीकडे लाखो जुने मंजूर टेम्पलेट्स असतील, तर त्यांना 60 दिवसांच्या आत या नवीन प्री-टॅगिंग नियमानुसार ते अपडेट करावे लागतील.

डिजिटल कम्युनिकेशनवरील अवलंबित्व वाढेल

हा नवीन नियम ट्रायच्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन्स 2018 ला बळकटी देतो. ज्याचा उद्देश अनधिकृत व्यावसायिक संप्रेषण पूर्णपणे रोखणे आहे.

Advertisement
Tags :

.