For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुक्मिणी वंसत लवकरच बॉलिवूडमध्ये येणार

06:33 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
रुक्मिणी वंसत लवकरच बॉलिवूडमध्ये येणार
Advertisement

कांतारा चॅप्टर 1 मधील नायिका

Advertisement

‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटात राजकुमारी कनकवती ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी रुक्मिणी वसंत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास तयार आहे. अभिनेत्रीने यासंबंधी संकेत दिले आहेत. ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटानंतर रुक्मिणीला अनेक भूमिकांच्या ऑफर्स मिळाल्या असून ती काही चित्रपटांकरता बोलणीही करत आहे.

अनेक भूमिकांसाठी चर्चा सुरु असून याकरता मी उत्साहित असल्याचे तिने म्हटले आहे. रुक्मिणी ही आगामी काळात यशच्या टॉक्सिक चित्रपटात दिसून येणार आहे. सैन्याची पार्श्वभूमी राहिल्याने रुक्मिणीला हिंदी भाषेचे ज्ञान आहे. हिंदी चित्रपटांशी माझे नेहमीच नाते राहिले11 आहे. सैन्य परिवाराशी संबंध असल्याने हिंदी नेहमीच आमच्या प्रत्येक छावणीला इतरांशी जोडणारा धागा राहिली असल्याचे तिने म्हटले आहे. 10 डिसेंबर 1996 रोजी जन्मलेल्या रुक्मिणीने कन्नड, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने कन्नड चित्रपट ‘बिरबल’द्वारे स्वत:च्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. तर 2023 मध्ये प्रदर्शित एका  चित्रपटामुळे तिला मोठे यश मिळाले.  याकरता तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.