Pandharpur News | विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी स्वयंवर चित्रे गायब
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कल्याण शेटे यांची दुर्मिळ चित्रे गायब
पंढरपूर -काही दिवसांपूर्वी बसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवांचा विवाह सोहळा झाला. मात्र, पुराणकाळात श्री रुक्मिणी मंडपात थोर व महान चित्रकार राजा रविवर्मा यांच्या शैलीत सांगली येथील सुप्रसिद्ध चित्रकार कल्याण शेटे यांनी बारदाना पोत्यावर रेखाटलेली चित्रे रुक्मिणी मंदिरातून गायब आहेत. दुर्मिळ चित्रे पुन्हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लावण्याची मागणी स्थानिक पातळीवर केली जात आहे.
महर्षी वाल्मीकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी श्री विठ्ठल मंदिर समितीला इशारा दिला असून पुन्हा ही दुर्मिळ व ऐतिहासिक चित्रे लावण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचाइशारा देण्यात आला आहे. ही मूळ चित्रे जलरंगात चितारलेली असून पोत्यावर काढली अहेत. १९८० मध्ये सांगली येथील सुप्रसिद्ध चित्रकार कल्याण शेटे यांनी पोत्यावर रेखाटलेली आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास पुरातन रूप देण्याच्या कामासाठी मागील गेल्या दोन वर्षांपासून ही चित्रे गायब झाली असून असलेली मूळ अस्सल चित्रे काढून त्याठिकाणी याच चित्राच्या डिजिटल फोटो कॉपी लावण्यात आल्या आहेत. एकूण ११ चित्रे असून कल्याण शेटे यांच्या चित्रात एक जिवंतपणा, ऐतिहासिक महान चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रासरखी प्रतिमा दिसून येते.
उत्पात समाजाचे तत्कालीन चेअरमन कै. प्रकाश उत्पात यांनी श्री रुक्मिणी स्वयंवर कथेतील विविध प्रसंग सांगून ही चित्रे काढण्यास कल्याण शेटे यांना सांगितले होते. अजून काही चित्र रेखाटायची होती पण एका अपघातात कल्याण शेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही मूळ दुर्मिळ चित्रे कुठे आहेत याबाबत श्री विठ्ठल-रक्मिणी मंदिर समिती अधिकारी यांना विचारले असता ही चित्रे खराब झाली असून संबर्धन कामा साठी काढण्यात आली असून ती सुरक्षित आहेत, असे सांगितले जाते. पण चित्रे कोठे आहेत हे दाखविले जात नाही.
वास्तविक पाहता ही चित्रे व मंदिर समिती यांचा काही संबंध नाही. मूळ पुजारी उत्पात यांनी स्वखर्चाने चित्रे काढून घेतली आहेत. तरीही मनाचा मोठेपणा दाखवून उत्पात मंडळीनी हक्क सोडला पण सर्वसामान्य भाविकांसाठी चित्र उपलब्ध करून देणे हे मंदिर समितीचे कर्तव्य आहे. मूळ चित्र कोणत्या कारणांनी काढली, ती सध्या कोठे आहेत, खराब झाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास पुरातन रूप देण्याच्या संवर्धन कामासाठी मागील गेल्या दोन वर्षांपासून श्री रुक्मिणी सभामंडपात असलेली मूळ अस्सल चित्रे मंदिर समितीकडून काढण्यात आली असून परंतु जुन्या काळात काढलेली चित्रे ही विलोभनीय व मनाला सुखावणारी होती. मंदिरात प्रवेश करताच भाविक पहात राहायचे, सध्या मूळ ठिकाणी त्याच चित्रांच्या डिजिटल फोटोकॉपी लावण्यात आल्या आहेत. मात्र या चित्रांना मूळ कलाकृतीचा दर्जेदार दिसून येत नाही.असतील तर त्याचे संवर्धन करून केव्हा लावणार यावर काहीच माहिती दिली जात नाही. यामुळे मूळ कल्याण शेटे यांच्या चित्राबाबत काय झाले, याची माहिती कळावी अशी अपेक्षा मंदिर परिसरातील स्थानिक रहिवासी, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त यांनी केली आहे.
चित्रे न लावल्यास आंदोलन छेडणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक गैरकारभार सुरू असून उत्पात समाजाच्या वतीने श्री रुक्मिणी सभामंडपात लावण्यात आलेल्या रुक्मिणी स्वयंवरची चित्रे गायब झाली आहेत. याच बरोबर जुन्या काळातील श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, चोखामेळा, सावता माळी यांची चित्रे होती, समितीने पुन्हा त्याच जागी ही चित्रे न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- गणेश अंकुशराव. (शहराध्यक्ष, महर्षी वाल्मीकी सेना )
पुन्हा चित्रे तिथे लावणार
सभामंडपात श्री रुक्मिणी लावण्यात आलेली श्री रुक्मिणी स्वयंबरची चित्रे खराब होऊ नयेत म्हणून काढण्यात आली होती. आता पुन्हा ही चित्रे तिथे लावण्यात येतील.
- गहिनीनाथ महाराज औसेकर,(सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती. पंढरपूर)