रुद्रेश्वरचे ‘मीडिया’ प्रथम, रसरंगचे ‘वुमन’ दुसरे
कला अकादमीच्या अ गट नाट्यास्पर्धेचा निकाल जाहीर : ‘मीडिया’ला एक लाखाचे पारितोषिक
पणजी : कला अकादमी गोवातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 57 व्या मराठी नाट्यास्पर्धेचा निकाल काल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत एक लाखाचे प्रथम पारितोषिक रुद्रेश्वर पणजीच्या ‘मीडिया’ या नाटकाला प्राप्त झाले. या स्पर्धेतील पंचाहत्तर हजाराचे द्वितीय पारितोषिक रसरंग उगवेच्या ‘वुमन’, तर पन्नास हजारांचे तृतीय पारितोषिक श्री शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ वास्कोच्या ‘लिअर ने जगावं की मरावं ?’ या नाटकाला प्राप्त झाले आहे. अभय थिएटर अकादमी गोवा पाळी, सुर्ला डिचोलीच्या ‘बर्फाग्नी’ व श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यासमाज बांदिवडे फोंडा यांच्या ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या नाटकांना प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. दिग्दर्शनासाठी दहा हजारांचे प्रथम पारितोषिक रुद्रेश्वर पणजीच्या गंगाराम नार्वेकर-सतीश (मीडिया), सात हजारांचे द्वितीय पारितोषिक रसरंग, उगवेच्या नीलेश महाले (वुमन), पाच हजारांचे तृतीय पारितोषिक श्री शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ वास्कोच्या वैभव नाईक (लिअर ने जगावं की मरावं ?) यांना प्राप्त झाले आहे.
वैयक्तिक अभिनय (पुरुष) सात हजारांचे प्रथम पारितोषिक सौरभ कारखानीस-विल्पव मुजुमदार (लिअर ने जगावं की मरावं ?), पाच हजारांचे द्वितीय पारितोषिक मिलिंद बर्वे-गुलाल रसुल (बर्फाग्नी) यांना प्राप्त झाले. वरेश फडके (ढब्बुशास्त्री)-किरवंत, रोहिदास राऊत (सिद्धेश्वर शास्त्री जोशी) - किरवंत, अविनाश नाईक (भिऊ)-मरणप्राय, संघर्ष वळवईकर (पिऊ)-मरणप्राय, संजीव प्रभु (सत्यव्रत)-ब्राम्हणकन्या, साईनंद वळवईकर (असीम भानु)-लिअर ने जगावं की मरावं ?, व्यंकटेश गावणेकर (प्रभाकर)-का ?, अंकुश पेडणेकर (होडरर)-रंगेहात, अथर्व प्रमोद जोशी (सुरज)-आक्रंद, अवनिश राऊत (मधू)-किरवंत यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
वैयक्तिक अभिनय (स्त्री) सात हजारांचे प्रथम पारितोषिक वैष्णवी पै काकोडे-मीडिया (मीडिया), पाच हजारांचे द्वितीय पारितोषिक डॉ. वेदिका वाळके-स्त्री 2 (वुमन) यांना प्राप्त झाले. त्याचबरोबर डॉ. संस्कृती रायकर (आशा)-असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, ममता शिरोडकर (निशा)-असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, प्रांजल मराठे (रेवती)- किरवंत, श्रेयस करमली कामत (एस्तर)-ब्राम्हणकन्या, सोबीता कुडतरकर (अऊंधती शर्मा) लिअर ने जगावं की मरावं ?, सुविधा बखले (स्त्री 1)-वुमन, माधुरी शेटकर (जेसिका)-रंगेहात, दिव्या श्रीरंग बर्वे (रेवा)-आक्रंद, मनुजा नार्वेकर लोकुर (दासी)- मीडिया, अर्चना डिचोलकर (नफिसा)-बर्फाग्नी यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले.
नेपथ्य (रु.5,000)-योगेश कापडी (मीडिया)-रुद्रेश्वर, पणजी. प्रमाणपत्रक : जयप्रकाश निर्मले (वुमन) रसरंग, उगवे. प्रकाशयोजना : (रु.5,000) -गंगाराम नार्वेकर (सतीश )-मीडिया-ऊद्रेश्वर, पणजी. प्रमाणपत्रक : वैभव नाईक (लिअर ने जगांव की मरावं ?) श्री शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ, वास्को यांना प्राप्त झाले. वेशभूषा (रु.5,000) स्वेता नार्वेकर (मीडिया)-रुद्रेश्वर, पणजी. प्रमाणपत्रक : दिपलक्ष्मी मोघे (रंगेहात)-इंद्रेश्वर यूथ क्लब गावडोंगरी- काणकोण. ध्वनीसंकलन/पार्श्वसंगीत (रु.5,000) सिंधुराज कामत (वुमन)-रसरंग, उगवे.
प्रमाणपत्रक : योगेश कापडी (मीडिया) ऊद्रेश्वर, पणजी. रंगभूषा (रु.5,000)-एकनाथ नाईक (मीडिया) ऊद्रेश्वर, पणजी. प्रमाणपत्रक : अमिता नाईक (वुमन)-रसरंग, उगवे.
नाट्यालेखन : प्रथम पारितोषिक (रु.10,000) डॉ. स्मिता जांभळे (का ?)-अथश्री, फोंडा. द्वितीय पारितोषिक (रु.7,000) संजीव बर्वे (आक्रंद)-विकास मंच सोशल क्लब, वाळपई-सत्तरी. खास स्पर्धेसाठी अनुवादित / रुपांतरित केलेल्या संहितेसाठी पारितोषिक (रु.10,000)-कौस्तुभ नाईक (ब्राम्हणकन्या)-गोमंत विद्या निकेतन, मडगाव.