Miraj | मिरज तालुक्यात जमिनीच्या नोटिशीवरून राडा; चुलत्याकडून पुतण्याला बॅटने बेदम मारहाण!
04:41 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
मालगावमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा
Advertisement
मिरज - मिरज तालुक्यातील मालगाव येथे जमीन मिळकती संदर्भात ग्रामपंचायतीकडून आलेल्या नोटीसीची माहिती दिली नसल्याच्या कारणातून चुलत काकांनी पुतण्याला बॅटने मारहाण केली. याबाबत ऋतुराज रावसाहेब तारदाळे (वय ३६) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, संशयीत अनिल बाबुराव तारदाळे, प्रदीप तात्यासाहेब तारदाळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ऋतुराज हे घरी असताना संशयीत चुलते अनिल तारदाळे प्रदीप तारदाळे यांनी घरी बोलविले. जमीनी संदर्भात ग्रामपंचायतीकडून नोटीस असल्याची माहिती मला का दिली नाही, असा जाब विचारला. यावर ऋतुराज यांनी काकूंना माहिती दिल्याचे सांगितल्यानंतरही त्यांना बॅ टने मारहाण करण्यात आली. यात ऋतुराज हे जखमी झाले.
Advertisement
Advertisement