गोव्यात दहा महिन्यात गोठवले 9 कोटी रुपये
डीजीपी अलोक कुमार यांनी दिली माहिती
पणजी : सायबर गुन्हा विरोधी विभागाने गेल्या दहा महिन्यात आर्थिक फसवणुकीच्या रकमेतील विविध बँक खात्यांतून 9 कोटी ऊपये गोठवले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे. एकूण आर्थिक फसवणुकीची रक्कम गोठवण्याच्या टक्केवारीनुसार गोवा आता भारतात 5 व्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात गोवा पोलिसांनी 30.46 टक्के रक्कम गोठवली आहे, असेही आलोक कुमार म्हणाले. येथील पोलीस मुख्यलायत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीजीपी अलोक कुमार बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राहूल गुप्ता तसेच निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते.
सायबर गुन्हा विरोधी विभाग चांगल्या प्रकारे कामगीरी बजावत असून त्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार साधनसुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केवळ तपास कामच नव्हे तर सायबर गुन्हे होऊ नये तसेच लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सायबर गुह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस सक्षम व्हावे म्हणून पोलिसांनाही प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर गुन्हा वारेधी विभागाने गेल्या दहा महिन्यात तब्बल 53 तक्रारी नोंद केल्या असून एकूण 44 संशयितांना अटक केली आहे.