For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | साताऱ्यात 'स्टँडअप इंडिया'च्या नावाखाली ५५ लाखांचा गंडा; कराड आणि मुंबईच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा

05:20 PM Apr 29, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime    साताऱ्यात  स्टँडअप इंडिया च्या नावाखाली ५५ लाखांचा गंडा  कराड आणि मुंबईच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा
Advertisement

                    स्टैंडअप इंडिया योजनेच्या नावाखाली साताऱ्यात ५५ लाखांची फसवणूक

Advertisement

सातारा -सातारा शहरातील सदरबझार परिसरात शासनाच्या स्टैंडअप इंडिया योजनेच्या नावाखाली व्यावसाय सुरू करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५५ लाख १७ हजार ५६९ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रसन्न अरुण भिसे (रा. मंगळवार पेठ कराड) अनिकेत हेमंत सुवर्णा (रा. खुटारी, मुंबई) यांनी फिर्यादी प्रसाद मिलिंद घमरे (वय ३०, रा. बिलासपूर, गोडोली, सातारा) यांना स्टैंडअप इंडिया योजनेतून टक्केवारीने सबसिडी मिळवून नवीन व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगूनविश्वास संपादन केला.

Advertisement

त्यानंतर २०२२ ते १३ जून २०२४ पर्यंत वेळोवेळी मोठी रक्कम घेतली. तसेच आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारातून एकूण ५५ लाख १७ हजार ५६९ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस याप्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक आहेत.

Advertisement
Tags :

.