For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : सांगोल्यात इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून १५ लाख रुपये उकळले

05:39 PM Dec 23, 2025 IST | NEETA POTDAR
solapur crime   सांगोल्यात इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून १५ लाख रुपये उकळले
Advertisement

                               सांगोल्यात पैशांसाठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात

Advertisement

सांगोला : इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून १५ लाख रुपये उकळले. फसवणूक केल्याप्रकरणी भोपसेवाडी, जवळा येथील व्यक्तीने संतोष राचय्या स्वामी (रा. गाताडे प्लॉट, जुना कराड नाका मागे, पंढरपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे.

श्रीमंत बापू वगरे (वय ५८, रा. भोपसेवाडी, जवळा, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष स्वामी याने ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पंढरपूर येथे फिर्यादी वगरे यांना मी तुमच्या दोन्ही मुलांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावतो, त्यासाठी इन्कम टॅक्स खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना देण्यासाठी पैसे लागतात असे सांगुन फिर्यादीकडून स्वामी याने ११ जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये घेतले.

Advertisement

त्यानंतर आज अखेर फिर्यादीच्या मुलास नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत म्हणून श्रीमंत वगरे (रा. भोपसेवाडी, जवळा, ता. सांगोला) यांच्या फिर्यादीनुसार संतोष स्वामी (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक पाटील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.