For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसप आमदाराच्या निवासस्थानातून 10 कोटी रुपये जप्त

06:22 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बसप आमदाराच्या निवासस्थानातून 10 कोटी रुपये जप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये बसप आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारपासून छाप्याची कारवाई सुरू केली होती. तर प्राप्तिकर विभागाची ही कारवाई गुरुवारी संपुष्टात आली. या कारवाईदरम्यान 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उमाशंकर सिंह यांचे कार्यालय आणि अन्य ठिकाणांवरील कारवाई अद्याप जारी आहे.

उमाशंकर विरोधात प्राप्तिकर विभागाने लखनौ, बलिया, सोनभद्र, कौशांबी, मिर्झापूर आणि प्रयागराजमध्ये 30 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते. 50 हून अधिक अधिकाऱ्यांची पथके या कारवाईत सामील झाली होती. उमाशंकर सिंह यांची छात्रशक्ती कंस्ट्रक्शन कंपनी आणि साईराम एंटरप्रायजेसच्या नावाने रस्तेनिर्मिती आणि खाणकामाशी निगडित कार्य करते. सोनभद्र येथील अवैध खाणकामामुळे सुमारे 60 कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता असा निष्कर्ष कॅगने काढला होता. कॅगच्या या अहवालानंतरच उमाशंकर सिंह यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.