महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभेसाठी आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात! केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंची मागणी

02:05 PM Sep 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ramdas Athawale
Advertisement

आम्हाला भाजपाच्या कोट्यात टाकू नये; सरकार आल्यावर एक-दोन मंत्रीपदही हवीत

रत्नागिरी प्रतिनिधी

महायुतीत आरपीआयचे स्थान महत्वाचे आहे. पण महायुतीत नवीन मित्र आल्याने आमची थोडीशी अडचण झालेली दिसत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला संधी दिली जात नाहीय. आगामी विधानसभेसाठी 10 ते 12 जागा मिळाव्यात, ही आमची मागणी असल्याचे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणात एखादी तरी जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. आम्हाला भाजपच्या कोट्यात टाकू नये. सरकार आलं तर 1 ते 2 मंत्रीपदं मिळावीत, महामंडळ मिळावीत. आम्हाला डावलू नये, असे आठवले म्हणाले.

Advertisement

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा संधी मिळाल्याने रत्नागिरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने त्यांचा शुक्रवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीत नवीन मित्र आलेत. त्यामुळे आमच्या पक्षाला संधी दिली जात नाहीय. कार्यकर्ते म्हणतात, आमचा विचार होत नाही हे खरं आहे. आरपीआयचं नाव त्यांनी घेणं आवश्यक आहे. आम्हाला डावलून चालणार नाही. या बाबत फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. नाहीतर उरले-सुरलेलं आम्हाला देतील, असे आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी सोशल मीडियात अफवा पसरवल्याने आम्हाला थोडं अपयश आलं. पण मोदींनी मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद हा 90 टक्क्यापर्यंत संपवण्यात आला आहे. आरक्षणावरून सध्या उठलेल्या गदारोळाबाबत आठवले म्हणाले, आरक्षण हे संविधानाने दिले आहे. स्वतंत्र मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी रास्त आहे. राज्य सरकार सकारात्मक आहे. केंद्राकडे जर हा विषय आला तर क्षत्रिय जाती किती आहेत याचा विचार करावा लागेल.

Advertisement

आम्हाला भाजपच्या कोट्यातील समजू नये!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी आम्हाला भाजपच्या कोट्यातील समजू नये. 23 तारखेला बावनकुळे यांना शिष्टमंडळ भेटेल. आमची 18 जागांची मागणी आहे. त्यापैकी 10 ते 12 जागा मिळतील. त्यामध्ये उमरखेड, धरावी, मालाड, चेंबूर, अंबरनाथ, औरंगाबाद, देगलूर आदींचा समावेश असल्याचे आठवले यांनी सांगितले. महायुतीने लोकसभेला राज ठाकरे यांचं स्वागतच केलं. पण राज ठाकरेंना घेऊ नये, असं माझं मत होतं. त्यांचा फार काही फायदा झाला नसल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, दोन ते तीन महिन्यात विस्तार होईल. तुम्हाला मंत्रीपद मिळेल असं सांगितलं होतं. पण त्या आधीच अजितदादा आल्याचे आठवलेंनी सांगितले.

संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही
राहुल गांधी यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाने निषेध आंदोलन केले आहे. राहुल गांधी बाहेर गेले की, देशाची बदनामी करतात. ते जबाबदार नेते आहेत. ते म्हणतात लोकशाही धोक्यात आली आहे. या देशात लोकशाही कधीच धोक्यात येऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. अफवा पसरवून लोकसभेत मतं घेण्याचा प्रयत्न झाला तर विधानसभेत यांचा डाव आम्ही उधळून लावू, असे आठवले म्हणाले.

नितेश राणेंनी भूमिकेत बदल करावा
नितेश राणे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतात. पण समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणं चुकीचं आहे. कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मुस्लीम हे आपलेच बांधव आहेत, त्यांचा विरोध करून अपयश पदरात पाडून घेऊ नये. नितेश राणे यांनी सर्वसमावेशक इमेज बनवणं अपेक्षित आहे. त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा, असे आठवले यांनी सुचविले.

‘वन नेशन वन इलेक्शन’ला माझा पाठिंबा
‘वन नेशन वन इलेक्शन’ अशी संविधानात सिस्टीम होती. सुऊवातीला काही निवडणुका अशाच झाल्या आहेत. देशाचा फायदा होणार आहे, हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. सर्वांनी सूचना मांडाव्यात. काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

माझं ऐकलं असतं तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपाकडे असते
भाजपने जर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिलं असतं तर हे सर्व घडलं नसतं. मी सांगत होतो, तीन वर्षे फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री व्हा, पुढची दोन वर्षे शिवसेनेला द्या. त्यावेळी उद्धवजींनी आमच्यासोबत रहायला हवं होतं. तसेच भाजपने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला हवा होता. शेवटी झालं काय तर पाचही वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला. पण माझं म्हणणं जर मान्य केलं असतं तर अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भाजपला मिळालं असतं, असे आठवले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर महायुतीत आले तर त्यांना मंत्रीपदाची मागणी करेन
वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. वंचितने अॅडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. वंचितने महायुतीत येणं आवश्यक आहे. त्यांना माझं निमंत्रण आहे. ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल. प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ही मागणी मी करेन, असे आठवले यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
Minister Ramdas AthawaleRPI
Next Article