For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

RPI Against Smart Meter स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रिपाइं आक्रमक! लोणंदमध्ये महावितरणला दिले निवेदन; जनता रस्त्यावर उतरण्याचा इशारा

09:18 PM Jun 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
rpi against smart meter स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रिपाइं आक्रमक  लोणंदमध्ये महावितरणला दिले निवेदन  जनता रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Advertisement

लोणंद : लोणंद शहरात वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सक्तीच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोणंद शाखेच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Advertisement

ग्राहकांची संमती न घेता प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप

महावितरणकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पूर्वसूचनेचे संदेश पाठविले जात आहेत. मात्र, ग्राहकांची कोणतीही संमती न घेता मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप रिपाइंने दिलेल्या निवेदनात केला आहे.

स्मार्ट मीटरमुळे भविष्यात ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार का? प्रीपेड प्रणाली लागू होणार का? तसेच बिलिंग पद्धतीत नेमके काय बदल होतील आणि ग्राहकांचे हक्क काय असतील, याबाबत महावितरणने कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. यामुळेच नागरिकांमध्ये मोठ्या शंका आणि संभ्रम निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

रिपाइं पदाधिकारी उपस्थित

निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे  अध्यक्ष: सागर खरात उपाध्यक्ष: सुहास कांबळे कार्याध्यक्ष: दादासाहेब रणदिवे सचिव संतोष खरात संघटक: सुनील अण्णासाहेब खरात उपस्थित होते.

लोणंदमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर नागरिकांचा वाढता विरोध पाहता, आता महावितरण प्रशासन यावर पुढे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावितरणने योग्य पाऊल न उचलल्यास जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.