For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत आरपीडी  हायस्कूलचे यश
Advertisement

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. या उज्ज्वल कामगिरीमुळे आरपीडी प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Advertisement

राज्यस्तरीय (शहरी) गटात कु. अश्लेषा उद्धव माळवे व कु. सृष्टी गोविंद परब या नववीतील विद्यार्थिनींनी संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावला. त्यांना ७,५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर कु. सोहम बापूशेट कोरगावकर याने पाचवा क्रमांक मिळवत ५,००० रुपये व सन्मानचिन्ह पटकावले. ठाणे येथे मान्यवर उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हास्तरावरही आरपीडीची बाजी
जिल्हास्तरीय (शहरी) गटात आरपीडीच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश मिळवले. तेजस्वी सगम – प्रथम, अमेय आपटे – द्वितीय आणि साक्षी गुरव – तृतीय क्रमांकावर राहिले.

Advertisement

तालुकास्तरावरही अव्वल कामगिरी
तालुकास्तरीय (शहरी) गटात शमिका केदार व महादेव परब यांनी प्रथम क्रमांक, जान्हवी मेस्त्री यांनी द्वितीय क्रमांक, तर अथर्व देवस्थळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

मराठी भाषा व ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध जिल्ह्यांतील सुमारे १,८०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या विषयावरील मराठी विश्वकोशातील नोंदी अभ्यासक्रमासाठी देण्यात आल्या होत्या. १०० गुणांच्या परीक्षेत ५० वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश होता.

या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत तसेच संस्था सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य श्रीमती सविता कांबळे, पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व पालक-शिक्षक संघ यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.