‘रॉयल’ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच
फ्लाइंग फी बाजारात, 154 किमीचे मायलेज देणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रॉयल इनफिल्ड यांनी आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्लाईंग फी भारतीय बाजारामध्ये दाखल केली आहे. बेंगळूरच्या शोरूममध्ये या नव्या मोटरसायकलचे नुकतेच लॉन्चिंग करण्यात आले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर मोटारसायकल 154 किमीचे अंतर कापू शकणार असल्याचा दावा कंपनीचा आहे.
एफएफ सी 6 ही नवी गाडी 3.91 केडब्ल्यूएच बॅटरीने युक्त आहे. संपूर्णपणे भारतातच ही मोटरसायकल तयार करण्यात आली आहे. 20 ते 80 टक्के इतकी बॅटरी 60 मिनिटांमध्ये चार्ज होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या गाडीच्या बुकिंगला 10 एप्रिलपासून सुरुवात झाली असून गाडीची डिलिव्हरी मे 2026 च्या अखेरीस सुरुवात केली जाईल. 2.89 लाख रुपये एक्स शोरूम किंमत कंपनीने ठेवली आहे.
3.91 केडब्ल्यूएच लिथीयम आयन बॅटरी
जास्तीत जास्त वेग 115 किमी प्रति तास
गाडीचे वजन 134 किलोग्रॅम
गर्डर शैलीचे फ्रंट सस्पेन्शन
चार्जिंगकरीता कालावधी 2 तास 16 मिनीटे
19 इंचाची व्हील्स (डिस्क ब्रेक ड्युअल चॅनेल एबीएससह)