महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रॉयल एनफिल्डची नवी हिमालयन 450 लॉन्च

06:32 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

बुलेट विश्वात नाव कमावलेल्या रॉयल एनफिल्ड यांनी हिमालयन 450 नवी अॅडव्हेंचरसाठी उपयुक्त अशी दुचाकी भारतात लॉन्च केली आहे.  दमदार मोटरसायकलच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या रॉयल एनफिल्ड यांनी हिमालयन 450 या नव्या दुचाकीचे लॉन्चिंग केले आहे. या अंतर्गत ग्राहकांना ही गाडी 10 हजार रुपयांच्या टोकन किमतीसह विक्रेत्यांकडे बुक करता येणार असल्याची माहिती रॉयल एनफिल्ड यांनी दिली आहे. या नव्या दुचाकीची एक्सशोरुम किंमत ही 2 लाख 69 हजार रुपये इतकी असणार असल्याची माहिती आहे. सदरची ही गाडीची सवलतीची किंमत 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे.

Advertisement

प्रकार आणि सुविधा : बेस, पास आणि समिट या तीन प्रकारांमध्ये दुचाकी सादर करण्यात आली आहे. सदरच्या दुचाकीमध्ये फुल्ल एलईडी हेडलाईट, टर्न इंडिकेटर, फुल्ली डिजिटल टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल अशा सुविधा असून कन्सोलमध्ये गुगल मॅप्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि म्युझिक प्ले बॅक सुविधा देण्यात आल्या आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article