For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉयल एनफिल्डचा होणार आंध्र प्रदेशात कारखाना

06:07 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
रॉयल एनफिल्डचा होणार आंध्र प्रदेशात कारखाना
Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

Advertisement

आयशर मोटर्स यांच्या मालकिची रॉयल एनफिल्ड आंध्रप्रदेशमध्ये निर्मिती कारखाना सुरू करत आहे. याकरिता कंपनी 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे.

तामिळनाडू राज्याबाहेर आयशर मोटर्सचा आंध्रप्रदेशमध्ये पहिला मोठा उत्पादन विस्ताराचा प्रकल्प साकारत आहे. सदरचा प्रकल्प आंध्रप्रदेशातील तिरुपतीमध्ये साकारला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एसआयपीबी) यांची प्रकल्पाला मंजुरी प्राप्त झालेली आहे.

Advertisement

या नव्या कारखान्यामुळे आंध्रामध्ये जवळपास 5000 जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. या कारखान्यातील उत्पादनानंतर 9 लाखांनी उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. जागतिक स्तरावर मोटार सायकल निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताचे योगदान येत्या काळात वाढणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम 2032 पर्यंत पूर्णत्वाला नेण्याची योजना बनविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.