रॉयल एनफील्ड शॉटगन 650 स्पेशल आवृत्ती लाँच
22 किमी प्रति लिटर मायलेजसह येणार
नवी दिल्ली :
भारतीय दुचाकी उत्पादक रॉयल एनफील्डने आयकॉन मोटोस्पोर्ट्ससोबत भागीदारी करून मध्यम-वजन श्रेणीतील बाईक शॉटगन 650 ची स्पेशल आव्रृत्ती सादर केली आहे. कंपनी मर्यादित आवृत्तीच्या बाईकचे फक्त 100 युनिट्स बनवेल. यापैकी फक्त 25 युनिट्स भारतीय बाजारात विकल्या जाणार असल्याची माहिती आहे. ही बाईक फक्त काही कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये पांढऱ्या रंगासह ‘ऑलवेज समथिंग’ थीम असेल. त्याची एक्स-शोरूम किंमत 4,25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या नियमित मॉडेलची किंमत 3.59 लाख रुपयांपासून सुरू होते, जी 3.73 लाख रुपयांपर्यंत जाते. याला 22 किमी प्रति लिटर मायलेज मिळेल.
बाईकमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीत. कामगिरीसाठी यात 648 सीसी एअर-ऑइल कूल्ड, पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे 46 बीएचपी पॉवर आणि 52 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. कंपनीचा दावा आहे की ही मोटरसायकल एका लिटर पेट्रोलमध्ये 22 किमी मायलेज देऊ शकते.डिझाइन: खरेदीदारांना नवीन ग्राफिक्ससह स्लॅबटाऊन इंटरसेप्ट आरई जॅकेट मिळेल. रॉयल एनफील्ड शॉटगन 650 लिमिटेड एडिशनने नवीन ग्राफिक्ससह त्याचे मूळ डिझाइन कायम ठेवले आहे.
हार्डवेअर: ब्रेकिंगसाठी, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, समोर 120 मिमी ट्रॅव्हलसह मोठा पिस्टन इनव्हर्टेड फोर्क आणि आरामदायी रायडिंगसाठी मागील बाजूस 90 मिमी ट्रॅव्हलसह शोवा ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स आहेत. या बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आहे. यात यूएसबी चार्जिंग पोर्ट, रिमूव्हेबल पिलियन सीट आणि मॅट ब्लॅक ट्विन पी-शूटर एक्झॉस्ट देखील आहे.