रॉयल इनफिल्डच्या किमती वाढल्या
नवी दिल्ली :
मोटरसायकल कंपनी रॉयल इनफिल्डच्या काही बाईक्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. कंपनेने रॉयल इनफिल्ड बुलेट 350 व रॉयल इनफिल्ड 350 क्लासिक यांच्या किमती वाढवल्या आहेत. रॉयल इनफिल्ड 350 च्या किमतीत आता 1628 ते 2025 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. विविध व्हेरियंटनुसार किंमती वाढवण्यात आल्याची माहिती आहे. बुलेट 350 च्या ब्लॅक गोल्ड रंगाच्या व्हेरीयंटची किमत सर्वाधिक 2025 रुपये इतकी वाढवली आहे. बटालियन ब्लॅकची किंमत 1628 रुपयांनी वाढवण्यात आली आहे तर मिलीटरी रेडची किमत जैसे थे ठेवण्यात आलीय. रॉयल बुलेट 350 ची किमत आता एक्सशोरुम 1,63,793 रुपये इतकी झालीय.
रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ची किंमत 1540 रुपये ते 1835 रुपये याप्रमाणात वाढवण्यात आली आहे. इमराल्ड व्हेरियंटची किमत 1835 रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. रेडडीच रेडची किमत 1540 रुपयांनी वाढवली आहे. आता एक्सशोरुम किमत यापुढे 1,82,658 रुपये इतकी असणार आहे.