वृत्तसंस्था /बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज शुक्रवारी आयपीएलचा सामना होणार असून दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात मिळविलेल्या विजयाने त्यांच्यावरील ताण हलका केलेला असला, तरी काही त्रुटी होणे बाकी आहे. त्यामुळे आपल्या मोहिमेमध्ये वेगवान सुधारणा करण्यावर त्यांच्याकडून लक्ष केंद्रीत जाईल. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला, तर नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला चार धावांनी पराभूत केले. परंतु या दोन्ही संघांसमोरील काही चिंता कमी झालेल्या नाहीत आणि त्या विशेषत: वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांशी संबंधित आहेत. पंजाबविऊद्ध 177 धावांचा पाठलाग करताना स्टार फलंदाज विराट कोहलीने चिन्नास्वामी खेळपट्टीवर उत्कृष्ट अर्धशतक झळकावल्यानंतर बेंगळूरचा संघ निश्चितच सुखावलेला असेल. असे असले, तरी कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांनी अद्याप चमक दाखविणे बाकी आहे आणि पंजाब किंग्जविऊद्ध विजयासाठी त्यांना शेवटच्या क्षणी दिनेश कार्तिक आणि ’इम्पॅक्ट प्लेयर’ महिपाल लोमरोर यांनी केलेल्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागले.
कोलकात्याकडे कमीत कमी कागदावर अधिक सक्षम गोलंदाजी विभाग आहे. अशा वेळी महत्त्वाच्या फलंदाजांना अपेक्षांना जागता आलेले नसल्याने आरसीबीसमोर त्यांचा सामना करताना गंभीर अडचणी येऊ शकतात. आरसीबीचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी पंजाबविऊद्ध चांगली कामगिरी केलेली असली, तरी संघाने माऱ्यात आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीचे आकडे 0/38, 1/43 असे राहिले आहेत. त्यामुळे थिंक टँक त्याच्या जागी इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपलेला आणण्याचा विचार करू शकतो. नाईट रायडर्सच्या फलंदाजीच्या बाबतीतही स्थिती वेगळी नाही. त्यांच्या कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन आणि नितीश राणा यांचा समावेश असलेल्या वरच्या आणि मधल्या फळीला सनरायझर्सविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना चांगली धावसंख्या उभारण्यासाठी शेवटी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ रमणदीप सिंग, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल या सहाव्या, सातव्या व आठव्या क्रमांकावरील फलंदाजांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता भासली. फलंदाजीत फारशी चमक दाखविता न आल्यानंतर नरेनने गोलंदाजीमध्ये फारशा धावा न देऊन (1/19) तितकी कसर भरून काढली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, वैशाख विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
कोलकाता नाइट रायडर्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन सकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रेहमान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप