कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नव्या कॉमेडी शोसह परतणार रोवन एटकिंसन

06:21 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काहीच न बोलता स्वत:च्या अभिनयाने लोकांना हसवू शकणारे मोजकेच अभिनेते आहेत. अशाचपैकी एका अभिनेत्याला मिस्टर बीम या भूमिकेसाठी ओळखले जाते. हा अभिनेता आता एका नव्या शोसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध अभिनेता रोवन एटकिंसन हे नेटफ्लिक्सवर लवकरच कॉमेडी शो ‘मॅन वर्सेस बेबी’सोबत परतणार आहेत. ही सीरिज 11 डिसेंबर रोजी ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. सीरिजचे चार एपिसोड्स असणार आहेत. नेटफ्लिक्सने या सीरिजची घोषणा करत अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये रोवन एटकिंसन हे एका मुलासोबत दिसून येत आहेत. एका छायाचित्रात ते दोन मुलांसोबत असून त्यांना बाटलीने दूध पाजवत आहेत. आणखी एका छायाचित्रात ते मुलासोबत एका शॉपिंग मॉलमध्ये आहेत. या शोमध्ये रोवन एटकिंसन एका महालाची देखभाल करणारी नोकरी सोडून एका शाळेच्या केयर टेकरची जबाबदारी सांभाळत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. तेथे त्यांना मुलाची देखभाल करावी लागते. रोवन यांची ही विनोदी धाटणीची सीरिज 2022 मधील प्रसिद्ध सीरिज ‘मॅन वर्सेस बी’चे पुढील स्वरुप आहे.

Advertisement

पाकिस्तानात भरतो वधूंचा बाजार

Advertisement

सोशल मीडियावर पाकिस्तानी वधूंच्या विक्रीच्या प्रकाराची एक पोस्ट शेअर होत आहे. पाकिस्तानात गरीबी आणि लिंग गुणोत्तर असंतुलनामुळे तेथील युवती चीनमध्ये ‘वधू’ म्हणून ट्रॅफिक होत आहेत. दीड लाख रुपयांमध्ये वधू आणि मोफत आईवडिलयुक्त ऑफर प्रत्यक्षात युवतीची खरेदी आणि तिच्या परिवाराचा सांभाळ करण्याचा प्रकार आहे.

पाकिस्तानात बिघडत्या आर्थिक स्थितीदरम्यान अनेक परिवार आता स्वत:च्या मुलींची विक्री करत कमाई करत आहेत. पाकिस्तानातील परिवार चीनच्या श्रीमंत पुरुषांशी स्वत:च्या मुलीचा विवाह पैसे घेऊन करवित आहेत, याचबरोबर स्वत:चा छोटा मुलगा किंवा मुलीला तिच्यासोबत चीनमध्ये पाठवत आहेत. अनेकदा आजारी आईवडिल देखील मोफत चीनमध्ये जात आहेत. या प्रकाराला विवाहाचे नाव दिले जात असले तरीही हा मानवतस्करीचा प्रकार आहे. चीनमध्ये आणले गेलेल्या या युवतींना नरकयातना भोगाव्या लागतात. या प्रकाराच्या शिकार ठरलेल्या बहुतांश मुली 12-18 वर्षांच्या असतात, ज्या प्रामुख्याने पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाच्या असतात. पाकिस्तानातील हा ब्राइड मार्केट आता बहरत आहे. चीनमधील लिंग गुणोत्तर असंतुलनामुळे या मार्केटला मोठी तेजी आली आहे.

चीनमधील पुरुष सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये जात मुलींना पसंत करत त्यांची खरेदी करतात. या मुलींसाठी ब्रोकर 2-9 लाख पाकिस्तानी रुपये घेतो. ब्रोकर (पाकिस्तानी आणि चिनी) मुलीला खरेदी करतात, बनावट व्हिसा अन् पासपोर्ट तयार करतात. कधीकधी त्रयस्थ देशाच्या मार्गाचा वापर करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article