For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरात बुधवारपासून दिवस आड पाणी पुरवठा

10:35 AM Feb 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोल्हापूरात  बुधवारपासून दिवस आड पाणी पुरवठा
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन चंबुखडी GSR ला जोडणेसाठी ठिक-ठिकाणी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. तसेच धरणातील पाणीसाठा विचारात घेता व कळंबा तलावाची पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने तलावातील जलचरांना धोका निर्माण झालेला आहे. भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करता महापालिकेच्यावतीने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, ई वॉर्ड अंशत: व सी, डी वॉर्ड तसेच सलग्नीत उपनगरे व ग्रामिण भागातील बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या भागामध्ये बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करणेचे नियोजित करण्यात आले आहे.

यामध्ये बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजीपासून आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7, व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराइमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी परिसर, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड परिसर, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर या भागामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

Advertisement

तर गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून महाद्वाररोड परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक परिसर, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम परिसर, चंद्रेश्वर, संख्यामठ परिसर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजीपेठ काहीभाग, गुजरी परिसर, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर परिसर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी या भागामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आव्हान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.