रोटरीच्या अन्नोत्सवमध्ये ‘मिस बेळगाव’ स्पर्धेने रंगत
वृंदा राणा ठरल्या मिस बेळगाव : पहिल्या-दुसऱ्या उपविजेत्यांकडूनही कौशल्याची झलक
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव-2025 मध्ये मंगळवारी ‘मिस बेळगाव’ स्पर्धा थाटात पार पडली. वृंदा राणा यांना मिस बेळगावचा किताब प्रदान करण्यात आला. परीक्षक अनुराधा गर्ग यांनी त्यांना मुकुट घातला. या स्पर्धेमध्ये पहिल्या उपविजेत्या वर्षा आर. एस. व दुसऱ्या उपविजेत्या प्रियांका कोकरे यांनी आपल्या कौशल्याची झलक दाखविली. या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिके देण्यात आली. मिस कॅटवॉक क्वीन वैष्णवी गुंडलूर, मिस कॉन्जोनिलिटी दीप्ती जानू, मिस टॅलेंट ज्वेल साहना टिरकी, मिस मोस्ट फोटोजेनिक तिशा अणवेकर, मिस डॅझलिंग स्माईल श्रीसाक्षी गच्ची यांनी मिळविला. स्पर्धेत परीक्षक म्हणून बीईंग ह्युमनच्या मार्केटिंग हेड उत्सा रॉय, भरतनाट्याम नृत्यांगना फाल्गुनी खन्ना, फॅशन डिझाईनर निधी कोसंदल आणि अनुराधा गर्ग यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम बीईंग ह्युमन यांच्याकडून प्रायोजित करण्यात आला होता. बीईंग ह्युमनने 500 रुपयांचे व्हाऊचर तिकिटांसह दिले आहे. ते व्हाऊचर डॉ. आंबेडकर रोड येथील बीईंग ह्युमनच्या स्टोअरमध्ये रिडिम केले जाऊ शकते. स्पर्धेतील विजेत्यांना बीईंग ह्यूमनसोबत फोटोशुट करण्याची संधी दिली जाणार आहे.