For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे ६० हजारांचे आरोग्य साहित्य वाटप

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे ६० हजारांचे आरोग्य साहित्य वाटप
Advertisement

मातोंड / वार्ताहर : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ₹६०,००० किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५० प्रकारची विविध औषधे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असलेला स्ट्रेचर यांचा समावेश आहे.

Advertisement

या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन परुळेकर सरांनी केले.

या कार्यक्रमास तुळस जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. प्रथमेश नाईक, डॉ. राजेश उबाळे, डॉ. दाभोलकर, काजू उद्योजक स्वप्निल झांट्ये, काजू उद्योजक दीपक ठाकूर, उद्योजक योगेश नाईक, पंकज शिरसाठ, तसेच जन आरोग्य समितीचे सहअध्यक्ष श्री. रवींद्र लिलके, जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य आणि तुळस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. रुग्णांच्या हितासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.