रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे सुभेदार संजय सावंत यांचा सन्मान
सावंतवाडी | प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूर ,ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक अशा शौर्यगाथांचे साक्षीदार असलेले भारतीय सैन्यदलातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर श्री संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीमार्फत सत्कार करण्यात आला.यावेळी सुभेदार मेजर संजय सावंत यांनी सैन्यदलातील गेल्या 33 वर्षातील यशस्वी प्रवास वर्णन करताना कारगिल युद्ध, बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन सिंदूरची शौर्य गाथा वर्णन करताना सर्वांच्याच अंगावर शहारे आले.राष्ट्रभक्ती हिच सर्वोच्च आहे.याचा प्रत्यय सुभेदार मेजर संजय यांचे व्यक्तिमत्त्वातून आला. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड सिध्दार्थ भांबुरे, सचिव सिताराम तेली, खजिनदार आनंद रासम व टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सच्चा शूरवीराचा सन्मान आपण केलात तो आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. असे प्रतिपादन सुभेदार मेजर संजय सावंत यांनी यावेळी केले.