रोटरी क्लब ऑफ शिरोडाचा उद्या पदग्रहण सोहळा
वेंगुर्ले (वार्ताहर)-
रोटरी क्लब ऑफ शिरोडा चा २७ वा पदग्रहण सोहळा सोमवार दि ४ ऑगस्ट रोजी सायंकाण ७.३० वाजता पणशीकर मंगल कार्यालय आरवली येथे संपन्न होणार आहे. रोटरी क्लब ऑफ शिरोडा चा सन २०२५-२६ या वर्षासाठी निवड आलेल्या नुतन पदाधिकारी अध्यक्ष दत्तात्रय भोसले, सचिव स्वप्नील गडेकर, खजिनदार सचिन गावडे यासह कार्यकारीणीतील पदाधिकारी व सदस्यांना कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती व मार्व्हलस इंजिनिअर कंपनीचे सर्वेसर्वा तथा माजी रोटरी गव्हर्नर संग्राम पाटील हे खास पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित राहून तर खास मार्गदर्शक म्हणून रोटरीच्या सावंतवाडी येथील असिस्टंट गव्हर्नर विनया बाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या रोटरी क्लब ऑफ शिरोडा च्या पदग्रहण सोहळ्यास जिल्ह्यातील रोटरी क्लबच्या पदाधिकारी, सदस्यांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्ल ऑफ शिरोडा चे अध्यक्ष जनार्दन पडवळ व सचिव राजन शिरोडकर यांनी केले आहे.