महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोटरी क्लब ऑफ बेळगाव पदाधिकाऱ्यांचा अधिकार समारंभ

11:27 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच फाऊंड्री क्लस्टर येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, प्रांतपाल शरद पै, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, जयंत हुंबरवाडी व दिलीप चांडक उपस्थित होते. याप्रसंगी नूतन अध्यक्ष म्हणून सुहास चांडक, सचिव डॉ. मनीषा हेरेकर, सहसचिव डॉ. संतोष पाटील, खजिनदार अल्पेश जैन यांना अधिकार सूत्रे देण्यात आली. माजी अध्यक्ष संदीप नाईक, विद्यमान उपाध्यक्ष अमित साठ्यो, सहसचिव डॉ. संतोष पाटील, व्होकेशनल सर्व्हिसच्या डॉ. शिल्पा कोडकिणी, तुषार पाटील, पीआरओ बकुळ जोशी, समाजसेवा-अक्षय कुलकर्णी याशिवाय मुकुंद बंग, प्रताप नलावडे, यशवंत मोहता, संतोष पावटे, मनोज हुईलगोळ यांना अधिकार प्रदान करण्यात आले.

Advertisement

याप्रसंगी कल्याण बॅनर्जी यांनी, रोटरीचे स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य कसे चालते याबद्दल माहिती दिली. रोटे. सुहास चांडक व दिलीप चांडक यांनी आपले वडील प्रेमराज चांडक यांच्या स्मृत्यर्थ रोटरीला 20 लाख 75 हजारची देणगी दिली. अध्यक्ष सुहास चांडक यांनी क्लबतर्फे ग्रामीण भागात शिक्षण सुविधा, आरोग्य शिबिर, कौशल्य विकास प्रशिक्षण, मुलांसाठी उद्यान  हे उपक्रम हाती घेण्यात येतील, असे सांगितले. याशिवाय अन्नोत्सव, स्कॉ, सबको विद्या शिष्यवृत्ती, युवा महोत्सव घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शरद पै यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. सचिव डॉ. मनीषा हेरेकर यांनी पुढील उपक्रमांची घोषणा केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article