रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा
रोटरी क्लब अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर
मयुर चराटकर
बांदा :
दिवाळी सणाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा बांदा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. ही स्पर्धा मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेआठ या वेळेत विठ्ठल रुक्माई मंगल कार्यालय, बांदा येथील सभागृहात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये पाच हजार व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 3000 व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये 2000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम ठेवण्यात आले आहेत आकाश कंदील पर्यावरण पूरक असावा, आकाश कंदील ची उंची जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत असावी, प्लास्टिक आणि थर्माकोलचे इतर प्रकारचे आकाश कंदील स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार नाहीत, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील, या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी बाबा काणेकर 9823661133, आबा धारगळकर 9422388248, स्वप्निल धामापूरकर 9423302187, त्यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेतील आकाश कंदीलला बल्ब लावण्यासाठी स्वतः सर्व साहित्य, बल्ब घेऊन यावे. स्पर्धकांना वीज कनेक्शन देण्यात येईल. त्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी उशिरा स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष प्रमोद कामत, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, सेक्रेटरी बाबा काणेकर, खजिनदार शिवानंद भिडे यांनी केले आहे.