महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रोटरी क्लब मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात  

12:25 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

रोटरी क्लब, बेळगाव मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच मेसॉनिक हॉल, कॅम्प येथे पार पडला. रो. नागेश मोरे यांची 2024-25 सालासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement

व्यासपीठावर रोटरीचे माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार, माजी अध्यक्ष रो. सतीश नाईक, माजी सचिव रो. गुलाबचंद चौगुले, प्रांतपालच्या साहाय्यक रो. पुष्पा पवृराव, नवीन अध्यक्ष रो. नागेश मोरे, सचिव रो. उदयकुमार इडगल व कार्यक्रमाचे व्यवस्थापक रो. मनोहर जाधव उपस्थित होते.

यावेळी रो. गुलाबचंद चौगुले यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल  दिला. रेसकोर्समध्ये वनमहोत्सव, खादरवाडी स्कूलमध्ये कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, अगसगे स्कूलमध्ये जेवणासाठी स्टील प्लेट्स, मराठी शाळांमध्ये अभ्यासासाठी पुस्तके व मराठी शाळा नं. 6 मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचचे वाटप करण्यात आले. माजी अध्यक्ष रो. सतीश नाईक यांनी केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले.

नवीन कार्यकारिणीची नावे जाहीर करण्यात आली.

माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते रो. नागेश मोरे यांना अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. सचिव उदयकुमार इडगल, खजिनदार दयानंद माळगी, अशोक कोळी, अशोक बदामी, नंदन बागी, डॉ. विजय पुजार, गुलाबचंद चौगुले, मनोहर जरतारकर, गिरीष बुदरकट्टी यांची इतर पदांसाठी नेमणूक करण्यात आली.

अविनाश पोतदार यांनी भाषणात रोटरीचा जगभरातील कामाचा आढावा घेतला व केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले. नवीन अध्यक्ष रो. नागेश मोरे यांनी पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन रो. मनोहर जरतारकर व रो. आनंद गुमास्ते यांनी केले. डॉ. श्रीशैल मेटगुड यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article