पर्सी जॅक्सन’च्या दुसऱ्या सीझनमध्ये रोजमेरी
4 नव्या व्यक्तिरेखांची एंट्री
अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक रिक रिओर्डन यांच्या पुस्तकावर आधारित सीरिज पर्सी जॅक्सन अँड द ओलंपियन्सचा पहिला सीझन 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता प्रेक्षकांना या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा असून याचा प्रीमियर चालू वर्षात होणार आहे.
पर्सी जॅक्सनचा पहिला सीझन पाहिला असल्यास यातील लोकप्रिय व्यक्तिरेखांची कल्पना असेल. परंतु आता सीरिजनमध्ये नव्या व्यक्तिरेखांची भर पडणार आहे. पर्सी जॅक्सन अँड द ओलंपियन्सच्या सीझन 2 मध्ये अनेक नवे चेहरे दिसून येणार आहेत. या सीरिजमध्sय रोजमेरी डेविट, एलेक्स पॉनोविक, केविन चाकोन, बीट्राइस किट्सोस यासारखे लोकप्रिय कलाकार दिसून येतील. रोजमेरी डेविट लोकप्रिय अभिनेत्री असून ती द बॉयज आणि मॅड मॅनमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आगामी सीरिजमध्ये रोजमेरी ही एका स्टायलिश टीचरच्या भूमिकेत असणार आहे.
पर्सी जॅक्सनच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेता एलेक्स पॉनोविकचीही एंट्री झाली आहे. अभिनेत्याला वॅन हेल्सिंग आणि स्नोपीयरसरमधील अभिनयासाठी ओळखले जाते. पर्सी जॅक्सनच्या दुसऱ्या सीझनमध्ये केविन चाकोन देखील दिसून येणार असून तो हर्मीसच्या पुत्राच्या भूमिकेत असेल. बीट्राइस किट्सोस एक रहस्यमय पात्र एलिसन सिम्स साकारणार आहे. नव्या कलाकारांमुळे पर्सी जॅक्सनच्या दुनियेत रोमांच वाढणार आहे. पॉलीफेमस आणि सीसीच्या व्यक्तिरेखेची ही कहाणी सीझन 2 मध्ये अधिकच रंजक ठरणार आहे.