महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रुटच्या अर्धशतकाने इंग्लंडला सावरले

06:42 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बर्मिंगहॅम

Advertisement

येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 5 बाद 157 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी विंडीजचा पहिला डाव 282 धावांत आटोपला.

Advertisement

विंडीजच्या पहिल्या डावात कर्णधार क्रेग ब्रेथव्हेट आणि होल्डर यांनी अर्धशतके झळकविली. डिसिल्व्हाचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. या सामन्यातील पहिल्या दिवशीच विंडीजचा पहिला डाव 75.1 षटकात 282 धावांत आटोपला. ब्रेथव्हेटने 8 चौकारांसह 61, होल्डरने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 59, डिसिल्व्हाने 3 चौकारांस 49, लुईसने 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे अॅटकिनसनने 67 धावांत 4 तर वोक्सने 69 धावांत 3, वूडने 52 धावांत 2 तसेच बशीरने 55 धावांत 1 गडी बाद केला.

इंग्लंडच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सिलेस आणि जोसेफ यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे मध्यफळीतील फलंदाज कोलमंडले. सिलेसने क्रॉलेला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. जोसेफने डकेटचा त्रिफळा उडविला. त्याने तीन धावा जमविल्या. सिलेसने वूडला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. इंग्लंडची यावेळी स्थिती 3 बाद 38 अशी होती. या धाव संख्येवरुन इंग्लंडने शनिवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि उपाहारापर्यंत त्यांनी आणखी दोन गडी गमविताना 113 धावांची भर घातली. उपाहारावेळी इंग्लंडने 33 षटकाअखेर 5 बाद 157 धावा जमविल्या. रुट 4 चौकारांसह 58, तर कर्णधार स्टोक्स 1 षटकार आणि 4 चौकारांसह 48 धावांवर खेळत आहेत. या जोडीने 6 व्या गड्यासाठी अभेद्य 103 धावांची भागिदारी केली. या सत्रामध्ये जोसेफने पॉपचा 10 धावांवर त्रिफळा उडविला. सिलेसने ब्रुकला 2 धावांवर झेलबाद केले. विंडीजतर्फे सिलेसने 35 धावांत 3 तर ए जोसेफ आणि शमार जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव- 75.1 षटकात सर्व बाद  282 (ब्रेथव्हट 61, होल्डर 59, डिसिल्व्हा 49, लुईस 26, अॅटकिनसन 4-67, वोक्स 3-69, वूड 2-52, बशिर 1-55), इंग्लंड प. डाव उपाहारापर्यंत 33 षटकात 5 बाद 157, (रुट खेळत आहे 58, स्टोक्स खेळत आहे 48, पॉप 10, क्रॉले 18, सिलेस 3-35, ए. जोसेफ व एस. जोसेफ प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article