For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साटेली-भेडशीत रूट मार्च !

12:11 PM Apr 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साटेली भेडशीत रूट मार्च
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर
साटेली-भेडशी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच त्रिपुरा राज्याच्या रिझर्व्ह फोर्सने संचलन केले. येथील बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला. ७ मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी हे संचलन करण्यात आले. यावेळी त्रिपुरा राज्याच्या रिझर्व्ह फोर्सचे जवान, दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचा समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.