महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डोचा गोल

06:35 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

लिस्बन येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या नेशन्स लीग गट ए-1 मधील फुटबॉल सामन्यात ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या निर्णायक गोलाच्या जोरावर पोर्तुगालने स्कॉटलंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisement

रोनाल्डोचा हा फुटबॉल क्षेत्रातील 901 वा गोल आहे. अलिकडेच क्रोएशीया विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने 900 गोलांचा टप्पा पार केला होता. रोनाल्डोचा हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील 131 वा गोल आहे. रविवारच्या सामन्यात रोनाल्डोने हा निर्णायक गोल 88 व्या मिनीटाला नोंदविला. सामन्याच्या पूर्वार्धात स्कॉट मॅकटोमेनीने स्कॉटलंडचे खाते उघडले होते. त्यानंतर सामन्याच्या उत्तराधार्थ ब्रुनो फर्नांडीसने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली होती. या पराभवामुळे स्कॉटलंडची पोर्तुगाल विरुद्धची पराभवाची मालिका खंडीत झालेली नाही. या स्पर्धेत गेल्या गुरूवारी झालेल्या सामन्यात पोलंडने स्कॉटलंडचा 3-2 असा पराभव केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article