For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारकरी संप्रदाय आणि स्थानिक एकवटले! पंढरपुरातील 'त्या' पडीक जागांवरून प्रशासनाला घेरले

05:21 PM Apr 10, 2026 IST | NEETA POTDAR
वारकरी संप्रदाय आणि स्थानिक एकवटले  पंढरपुरातील  त्या  पडीक जागांवरून प्रशासनाला घेरले
Advertisement

                                     रॅलीद्वारे पंढरपूरकरांनी दाखवले शक्तीप्रदर्शन

Advertisement

सोलापूर -एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आसीफ मलंग मुजावर (रा. शास्त्री नगर, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या फिर्यादीवरून बळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडितेचा आसीफ मुजावर याने एकतर्फी प्रेमातून वारंवार तिचा पाठलाग करून तिचा हात धरून ओढून तिच्या मनास लज्जा बाटेल असे कृत्य करूनतिचा विनयभंग केला होता. त्यामुळे याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात आसिफ मुजावर यास अटक करून पोलीसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठिवले होते.

Advertisement

त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद, पीडितेची साक्ष, पुरावा ग्राहृय धरून न्यायाधीश मोहिते यांनी आरोपीस ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, अॅड. कविता बागल यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. कदेर आवटी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई कोळी यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.