रोल्स रॉयसची स्पेक्ट्रे ब्लॅक बॅज कार लाँच
44,000 कलरचे पर्याय : किंमत 9.5 कोटी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लक्झरी कार निर्माती कंपनी रोल्स-रॉयस इंडियाने भारतीय बाजारपेठेत स्पेक्ट्रे ब्लॅक बॅज ही कार लाँच केली आहे. ही कंपनीची कार इलेक्ट्रिक आहे. रोल्स-रॉयस स्पेक्ट्रेची ब्लॅक बॅज ही आता सर्वात जास्त पावरफुल कार देखील आहे. महत्त्वाचे म्हणजे 44,000 कलर ऑप्शन मिळतात. सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.5 कोटी रुपये ठेवली आहे, जी स्टँण्डर्ड स्पेक्ट्रे ईई पेक्षा अधिक आहे. रोल्स-रॉयस इंडियाने जानेवारीमध्ये स्पेक्ट्रे ईवीचे 7.62 कोटी रुपये एक्स-शोम किंमतीसह सादरीकरण केले होते. विक्री चेन्नई आणि नवी दिल्ली डीलरशिपवरही सुरुवात केली आहे. 659एचपी पावर आणि 493-530केएमची श्रेणी रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ब्लॅक बॅज ऑल व्हील ड्राइव्ह ऑप्शनची साथ आहे. इलेक्ट्रिक मोटर्सवर पॉवर देण्यासाठी कारमध्ये 102केडब्लूएच बॅटरी दिली गेली आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी फास्टिंग सपोर्ट मिळावा यासाठी कारमध्ये दोन स्पेशल मोड्स दिले आहेत.