रोहीतचा भारतीय संघ सर्वोत्तम : शास्त्री
वृत्तसंस्था / दुबई
रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील सध्याचा भारतीय क्रिकेट संघ हा सर्वोत्तम असून त्याला शंका घेण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन भारताचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीने केले आहे.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा मंगळवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि मोहम्मद शमीची कामगिरी अधिक उल्लेखनिय असली तरी सांघिक कामगिरीचे तंत्र या संघाला अचूकपणे मिळाल्याचे दिसून येते. भारतीय वनडे संघ हा सर्वोत्तम असून त्याबद्दल शंकाही घेण्याचे कारण नाही, असे शास्त्राrने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या उपांत्य सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये विजयोत्सव साजरा करताना अचानकपणे रवी शास्त्राRचे तेथे आगमन झाले. भारतीय संघातील श्रेयस अय्यर, शुभमन गिल, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांची क्षेत्ररक्षणातील कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली असून शास्त्राrने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप यांना धन्यवाद दिले आहेत. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या या उपांत्य सामन्यात निश्चितच दोन्ही संघावर अधिक दडपण होते. पण अशा स्थितीत भारतीय संघ दडपण हाताळून चांगली कामगिरी करु शकतो हे सिद्ध झाल्याचे शास्त्राrने म्हटले आहे. भारतीय संघाला आता दडपणाखाली खेळ करताना यापुढे अवघड जाणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.