रोहीतला पुत्ररत्नाचा लाभ
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहीत शर्माला शुक्रवारी रात्री उशीरा पुत्ररत्नाचा लाभ झाला. रोहीतचे हे दुसरे आपत्य आहे. रोहीतला समायरा ही पहिली मुलगी आहे.
रोहीतची पत्नी रितिका हिने शुक्रवारी रात्री येथील एका खासगी रुग्णालयात पुत्ररत्नाला जन्म दिला. रोहीतने या समस्येमुळे भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नव्हता. पण आता तो 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जाते. 2018 साली रोहीतला समायरा ही पहिली कन्यारत्न प्राप्त झाली होती. पहिल्या कसोटीत रोहीत उपलब्ध राहिल, अशी आशा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केली आहे. बलाढ्या ऑस्ट्रेलियाची मुकाबला करताना भारतीय संघाला सध्याच्यास्थितीत कर्णधार रोहीत शर्माची नितांत गरज भासत आहे. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला साथ देणारी असल्याने या खेळपट्टीवर सलामीच्या फलंदाज म्हणून रोहीतची गरज संघाला भासत आहे. रोहीत पहिल्या कसोटीत खळू शकला नाही तर अभिमन्यु ईश्वरनला सलामीला फलंदाजीस पाठविले जाईल. सध्या भारतीय संघासमोर दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या उभी राहिली असून आतापर्यंत या जखमी खेळाडूंच्या यादीत के. एल. राहुल, विराट कोहली, शुभमन गिल यांचा समावेश आहे.