महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोहितच्या नेतृत्वात वर्ल्डकप न जिंकल्याची लागली हुरहुर!

09:02 PM Dec 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अनुजा कुडतरकर 

Advertisement

रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केली खंत

Advertisement

सावंतवाडी -

रोहितच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप न जिंकल्याची हुरहुर लागली अशी खंत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आज सावंतवाडी येथे व्यक्त केली .सावंतवाडीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला असता तर आनंद झाला असता. रोहित शर्माचे वय आता 36 वर्षे आहे. आणि पुढील वर्ल्डकप हा अजून 4 वर्षांनी होणार आहे. भारतीय क्रिकेटर जास्तीत जास्त वयाच्या 40 वर्षापर्यंत क्रिकेटमध्ये तग धरत असतात. त्यामुळे, यावर्षीचा वर्ल्डकप रोहितचा शेवटचा वर्ल्डकप ठरू शकतो असे ते म्हणाले. 2011चा वर्ल्डकप भारताने जिंकला. या वर्ल्डकप मध्ये आपण नाही ही खंत रोहितला होती. त्यामुळे यावर्षीचा वर्ल्डकप आपल्या हाती असावा अशी रोहितची आणि माझीही इच्छा होती. पण, दुर्दैवाने आपल्याला पराभव पत्करावा लागला अशी खंत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आज येथे व्यक्त केली.

Advertisement
Tags :
# Dinesh lad # Rohit Sharma's coach # sawantwadi # tarun Bharat news update #
Next Article